पुणे : व्यावसायिक आयुष्यात एक टप्पा असा येतो की, त्यावेळी सर्व गोष्टींची पूर्तता होते. त्यानंतर आपण समाजाचा अविभाज्य भाग आहोत. आणि त्यामुळे या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून काम करण्याची आवश्यकता असते. याच भावनेतून मी काम करीत असून यापुढच्या काळात समाजाचे ऋण फेडण्यासाठी शक्ती मिळो, असे प्रतिपादन लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे माजी प्रांतपाल लायन विजय भंडारी यांनी आज केले.
माजी प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट, लायन्स क्लब, जीतो पुणे, युगल धर्म संघ आणि इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, ॲड. एस के जैन, जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जीतो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, डॉ. प्रदीप बाफना, रोशनी भंडारी-बाफना, गौरव बाफना, डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लायन श्याम खंडेलवाल, माजी खजिनदार लायन राजेंद्र गोयल, प्रसिद्ध उद्योजक इंदर जैन, इंदर छाजेड, राजेंद्र बाठीया, मनोज छाजेड, लखिचंद खिंवसरा, अजित सेठिया, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, बाळासाहेब ओसवाल, बाळासाहेब धोका आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या वतीने लोणावळा परिसरातील गरजु रुग्णांना मोफत तपासणी व औषधे, १०० विविध शाळांमध्ये १०० सॅप्लिंग्ज लायब्ररी, गरजुंना प्रति १० रुपये प्रमाणे दररोज १०० अन्नाचे पॅकेट्स, मुकबधिर शाळेतील गरजु मुलींना १२ सायकलचे वाटप, १० वेगवेगळ्या शाळेतील ५ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशीप, २५० झाडांची लोणावळा परिसरात देवराई हे सामाजिक उपक्रम करण्यात आले.
विजय भंडारी हे समाजाला लाभलेले रत्न आहे. ईश्वराचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. हाती घेतलेले कोणतेही काम उत्तमपणे पूर्णत्वास नेण्याची ताकद विजय भंडारी मध्ये दिसून येते. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांच्या या गुणांमुळेच विजय भंडारी हे आज अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. आणि त्यांचे काम नियोजनबद्ध सुरु आहे. विजय भंडारी हे यामुळेच समाजाचा अमूल ठेवा बनले आहेत, अशा भावना राजेश सांकला, अॅड. एस के जैन, कांतिलाल ओसवाल, इंदर जैन, राजेंद्र बाठिया, श्रीनाथ भिमाले, बाळासाहेब ओसवाल, बाळासाहेब धोका आदी मान्यवरांनी व्यक्त केल्या.लायन श्याम खंडेलवाल यांनी सूत्रसंचालन केले. लायन जिनू लोढा यांनी आभार मानले.
मित्र, सहकारी… ही माझी ताकद!
व्यवसाय असो की, सामाजिक कार्य… कोणतेही काम करताना सहकारी सोबत असणे अतिशय महत्वाचे असते. त्यामध्ये आपले सहकारी जर आपले मित्र बनले तर, नियोजित काम यशस्वी होते. माझ्या जीवनात मला प्रत्येक टप्प्यावर चांगले सहकारी भेटले. तेच माझे मित्र बनले. आणि काम करण्यातला आनंद आणखीच वाढला. त्यामुळे मित्र, सहकारी… हीच माझी ताकद आहे. त्यांच्यामुळेच मी काम करू शकलो. ही माझी प्रांजळ भावना आहे.
- लायन विजय भंडारी (माजी प्रांतपाल, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२)