मुंबई | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने 2010 मध्ये एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक बनवले. त्यानंतर क्रिकेट विश्वाच्या 2010 ते 2023 या कालावधीत आत्तापर्यंत 10 द्विशतक बनवले. यात भारतीय खेळाडूंचा मोठा डंका आहे. दहापैकी सात द्विशतक भारतीय खेळाडूंनी बनवले आहेत.
सर्वात पहिले द्विशतक सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केले. यात सचिनने 147 चेंडूंमध्ये नाबाद 200 धावा काढल्या. त्याने 25 चौकार व 3 षटकार मारले. त्याच्याच दुसऱ्यावर्षी वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना 149 चेंडूंमध्ये 219 धावा काढल्या. यात सेहवागने 25 चौकार व 7 षटकार मारले. दोन वर्षात भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 158 चेंडूंमध्ये 209 धावा केल्या. यात त्याने 12 चौकार व 16 षटकार मारून आपल्या नावावर एक नवा विश्वविक्रम केला.
त्यानंतरच्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध रोहितनेच 173 चेंडूंमध्ये 264 धावा केल्या. या सामन्यात त्याने 33 चौकार व 9 षटकार मारले. हा रोहितचाच नव्हे तर विश्वातला एकदिवसीयमधील सर्वात मोठा स्कोर आहे. 2014 मध्ये न्यूझीलँडचा मार्टिन गप्टिलने वेस्ट इंडिज विरुद्ध 163 चेंडूमध्ये 237 धावा केल्या. यात त्याने 24 चौकार व 11 षटकार मारून हा सामना मजेशीर केला.
त्याचवर्षी वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलने झिंबाब्वे विरुद्ध 147 चेंडूंमध्ये 215 २१५ धावा केल्या. यात गेलने १० चौकार व १६ षटकार मारले. २०१७ मध्ये रोहितने पुन्हा श्रीलंके विरुद्ध १५३ चेंडू मध्ये २०८ धावा केल्या. १३ चौकार व १२ षटकार मारले. २०१८ साली पाकिस्तान चा खेळाडू फकर झमन याने झिंबाब्वे विरुद्ध त्याने १५६ चेंडूमध्ये २१० धावा केल्या. यात त्याने २४ चौकार व ५ षटकार मारले. २०२२ मध्ये इशान किशनने बांगलादेशविरुद्ध १३१ चेंडूमध्ये २१० धावा केल्या. २४चौकार व १० षटकार मारले यावर्षाच्या सुरवातीला शुभमन गिलने न्युझीलँड विरुद्ध १४९ चेंडू मध्ये २०८ धावा केल्या. १९चौकार व ९ षटकार मारले. आपण जर बघितले दिवशतकां मध्ये भारताचा मोठा बोलबाला आहे.