दिल्ली। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर खेळणार आहेत. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने १००वी कसोटी खेळण्या आधी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या बैठकीची छायाचित्रेही बीसीसीआयने शेअर केली आहेत. या भेटीत त्याच्यासोबत त्याची पत्नी पूजाही त्याच्यासोबत होती. दिल्ली कसोटी ही पुजाराची 100 वी कसोटी आहे.
पुजाराने ट्विट केले की, “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटणे हा एक सन्मान होता. माझ्या १००व्या कसोटीपूर्वी मी तुमच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आभारी आहे. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुजाराने शेअर केलेल्या ट्विटवर उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘आज तुला आणि पुजाला भेटून आनंद झाला. तुझ्या कारकिर्दीतील 100 व्या कसोटीसाठी शुभेच्छा.
बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून फॉर्ममध्ये परतल्याचा दाखला या कसोटी खेळाडूने दिला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात तो केवळ ७ धावा करून बाद झाला.अता पुजाराकडून त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.