पुरुष गटात नाईट रायडर्स तर महीला गटात सेसी स्ट्रायकर्स संघाचा विजय
पुणे | पुण्यामध्ये युगल धर्म संघ आणि युगल धर्म संघ युथ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ व १४ जानेवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जितो पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला, सकल जैन संघ पुणेचे अध्यक्ष विजयकांत कोठारी आणि बिबवेवाडी संघाचे अध्यक्ष पोपटशेठ ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात 8 संघ तर महीला गटात 4 संघ सहभागी झाले होते…एकूण २८९ खेळाडूंनी या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला… यादरम्यान केवळ क्रिकेटच नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी, मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ जसे की चेस, गुणवत्तेवर आधारित असलेले खेळ घेण्यात आले.
पुरुष गटातील क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत ही वायडीएस नाईट रायडर्स संघ आणि वायडीएस ब्लास्टर्स संघ यांच्यात झाली…या लढतीत वायडीएस नाईट रायडर्स या संघांनी वायडीएस ब्लास्टर्स या संघाचा पराभव करत ४२ धावांनी विजय मिळवला. तसेच महिला गटात वायडीएस डॅजलिंग डीवास संघाविरुद्ध वायडीएस सेसी स्ट्रायकर्स संघ अशी लढत पाहायला मिळाली. यामध्ये वायडीएस सेसी स्ट्रायकर्स या संघाने वायडीएस डॅजलिंग डीवास या संघाला केवळ १२ धावांनी पराभूत केलं.
यावेळी कार्यकारिणी कमिटी, खेळाडूंसोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.