पुणे: जीतो पुणे युथ विंग आणि जीतो पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जीतो युथ प्रीमियर लीग 2024’ या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता बिबवेवाडी परिसरातील पुष्पा स्पोर्ट्स अकॅडमी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री इशिता राज शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जीतो युथ प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन सोहळ्यासाठी जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, जीतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशन अपेक्सचे चेअरमन इंदर जैन, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदरकुमार छाजेड, व्हॉइस चेअरमन चेतन, मुख्य सचिव दिनेश ओसवाल, सचिव लक्ष्मीकांत खाबिया, खजिनदार दिलीप जैन, विशाल सिंघवी, हितेश शहा, अमोल कुचेरिया, आनंद चोरडिया, अॅपेक्स डायरेक्टर प्रियंका परमार, जीतो पुणे वुमन विंगच्या अध्यक्षा पूनम ओसवाल, खुशाली चोरडिया, आचल भंडारी, जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष गौरव बाठिया, मुख्य सचिव सुयोग बोरा तसेच निकुंज ओसवाल, स्पर्धेचे समन्वयक ऋषभ दुगड व सहसमन्वयक अभिषेक मुथा, निकुंज ओसवाल, दीपक जैन, करण मिसाळ, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक दुगड ग्रुपचे रवींद्र दुगड व सर्व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याबरोबरच जीतो युथ प्रीमियर लीग 2024 चे मुख्य प्रायोजक ‘दुग्गड ग्रुप’, सह प्रायोजक ‘स्टडी स्मार्ट’, जर्सी प्रायोजक ‘डेक स्टुडिओ’, फूड प्रायोजक ‘कुशल लँडमार्कस्’, कॅप प्रायोजक ‘IBN’, किट प्रायोजक ‘तन्मय अँड मकवाना कन्स्ट्रक्शन’, टॉस का बॉस लाईट बल्ब, मीडिया पार्टनर ‘महाराष्ट्र न्यूज नेटवर्क’, ब्रॅण्डिंग पार्टनर ‘द वन एजन्सी’, मोमेंटो प्रायोजक ‘रविराज डायमंडस्’ इव्हेंट पार्टनर ‘स्क्वेअर प्रोडक्शन’ हे आहेत.जीतो युथ प्रीमियर लीग या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सर्व सहभागी संघांनी उत्साहात सहभाग घेतला असून या स्पर्धेत विविध खेळाडू आपल्या कौशल्याची चमक दाखविण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत 350 जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून या स्पर्धेत एकूण 30 संघांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये 24 पुरुष तर 6 महिलांचे संघ आहेत. स्पर्धेचे स्वरूप लीग पद्धतीचे असून प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोहेंबर रोजी होणार आहे आणि विजयी संघाला जीतो युथ विंगकडून गौरवण्यात येणार आहे.
“जीतो पुणे युथ विंगचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले पाहिजे. यावेळी आपण गल्लीपासून सुरुवात केली असून आपण दिल्ली पर्यंत पोहोचणार आहोत. क्रिकेट हा खेळ सांघिक भावना वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे जीतो युग प्रीमियर लीगच्या माध्यमातून युवा पिढी एकत्र येत आहे. त्यांच्यात आपलेपणा वाढतोय. त्यांच्यात बाँडिंग वाढते आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, या गोष्टी खूप उपयुक्त असतात. आणि त्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरते आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व 30 संघांचे आणि स्पर्धेच्या आयोजकांचे व त्यासाठी मदत करणाऱ्या प्रायोजकांना धन्यवाद आहेत “.
विजय भंडारी (राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अॅपेक्स )
“क्रिकेट हा खेळ असा आहे जो सर्वांना एकत्र आणतो. आणि हीच भावना या उपक्रमामागे आहे. जीतोची सर्व तरुण पिढी आणि त्यांच्या सोबत इतर सर्वच यानिमित्ताने एकत्र येत आहेत. खेळण्यातून कधी आपण जिंकण्यासाठी लढतो हे समजत नाही. परंतु, हा गुण आपल्यामध्ये विकसित होत जातो. त्यामुळे हे व्यासपीठ अत्यंत महत्वाचे आहे. सर्व आयोजक व प्रायोजक यांचे मनापासून धन्यवाद आहेत”.
इंदरकुमार छाजेड (अध्यक्ष, जीतो पुणे)
“जीतो युग प्रीमियर लीगसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत. सांघिक खेळातून सांघिकपणाची जी भावना विकसित होते ती आपल्या व्यावसायिक जीवनातही उपयुक्त ठरते. म्हणूनच जीतोच्या माध्यमातून अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. याचा उपयोग प्रत्येकाला होतो”.
इंदर जैन (चेअरमन, जीतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशन अपेक्स)
“जीतो पुणे युथ विंगच्या नवीन कार्यकारिणीचा हा पहिलाच उपक्रम आहे. या स्पर्धेमुळे युवा क्रीडा प्रेमींमध्ये विशेष उत्साह आणि उर्जा दिसून येत आहे. जीतो युथ प्रीमियर लीग ही स्पर्धा केवळ खेळासाठी नाही तर, यातून युवा पिढीला प्रेरणा मिळते आणि संघभावनेला प्रोत्साहन देखील मिळते”.
गौरव बाठिया (अध्यक्ष, जीतो पुणे युथ विंग)