पुणे | विजयादशमी हा सण मोठ्या उत्सवात देशभरात साजरा केला जातो. हा सण अंमंगळावर मंगळाच्याbisarkh विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले होते अशी आख्यायिका आहे. प्रभू श्रीरामांच्या विजयामुळे दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पण भारतात असे ही गाव आहे जिथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही तर पूजा केली जाते.
रावणाचा जन्म भारतात झाला असून उत्तर प्रदेश राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बिसरख गावात झाला. जे दिल्लीपासून अवघ्या 40 किमी अंतरावर आहे. रावण हा आपला पूर्वज असल्याचे येथील लोक मानतात. एवढेच नाही तर दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहनही केले जात नाही आणि या गावात दस-यादिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. या गावात दशनानाचे मंदिर असून येथील लोकही त्याची पूजा करतात.
रावणाचे आजोबा पुलस्त्य आणि वडील विश्व ऋषी यांचे बिसरख हे गाव होते. याच ठिकाणी रावणाचा जन्म व शिक्षण झाले. आणि त्याचा भाऊ, बहीण कुंभकरण, शूर्पणखा आणि विभीषण यांचा जन्मही येथे झाला. याच गावात रावणाच्या आजोबांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते. जिथे रावणाचे वडील आणि रावणाने सुद्धा शिवलिंगासमोर तपश्चर्या केली आहे. बिसरख गावाच्या मध्यभागी बांधलेले रावणाचे मंदिर आकर्षणाचे केंद्र आहे. हे मंदिर भोलेनाथाला समर्पित आहे.बिसरख गाव हे अष्टकोनी शिवलिंगाची स्थापना करणारे देशातील पहिले स्थान आहे.
देशातील बहुतांश भागात दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. मात्र बिसरख गावात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जात नाही. कारण हे आहे की काही वर्षापूर्वी या गावातील लोकांनी रावणाचा पुतळा जाळला होता. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने गावात रावणाचं दहन बंद करण्यात आलय. तसेच दसरा न साजरा करण्याबाबत येथील लोक अनेक कथा सांगतात