पुणे | नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज माँ आशापुरा माता मंदिरात सुमारे हजारो मुलांच्या उपस्थितीत श्री सुक्तपठण करण्यात आले. महावीर प्रतिष्ठान आणि आरएमडी स्कूलच्या सुमारे हजारो मुलांच्या उपस्थितीत एक सुरात झालेल्या या श्री सुक्तपठणामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले. यानिमित्ताने आशापुरा मातेचा गजर संपूर्ण परिसरात दुमदुमला.
चारही वेदांमध्ये श्री सुक्तपठणाचा उल्लेख असल्याने आणि माता लक्ष्मीचे आवाहन करण्यासाठी श्री सुक्तपठण केले जाते. म्हणून श्री सुक्तपठणाचे महत्व सर्वाधिक आहे. सर्व समाजाचे, संपूर्ण विश्वाचे कल्याण होण्यासाठी आपण माता लक्ष्मीचे आवाहन करतो. आणि त्यासाठी श्री सुक्तपठण करतो. त्यासाठी महावीर प्रतिष्ठान आणि आरएमडी स्कूल मधील विद्यार्थी माँ आशापुरा माता मंदिरात आले होते. सुमारे हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हे श्री सुक्तपठण करण्यात आले, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
गंगाधाम चौकाजवळ असलेल्या माँ आशापुरा माता मंदिरात नवरात्र उत्सव सुरु असून उत्सवानिमित्त अभिषेक, नवचंडी यज्ञ, श्री सुक्तपठण सारखे विधी केले जातात. तसेच, दररोज हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असून येणाऱ्या भक्तांना माँ आशापुरा मातेचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी दर्शनाची, प्रसादाची व आलेल्या वाहनांच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने केली आहे.