पुणे | पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित शेठ आर.एन.शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल व डॉ.जी.जी.शहा इंग्लिश मीडियम हायस्कूल यांचे आगळे-वेगळे स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी शाळेमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांमध्ये चांगले विचार, आदर्श, आचार व सत्पुरुषांचे गुण रुजावे या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत नाट्य प्रस्तुत करण्यात आले.
यामध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या एकूण १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ ते शिवराज्याभिषेकपर्यंत विविध घटनांचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले. त्याबरोबरच पाळणा, भारूड, पोवाडा, यांसारखे संगीत प्रकार विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले.
संस्थेचे चेअरमन राजेश शहा, सचिव हेमंत मनियार, प्रमोद शहा, मोहन गुजराथी, मनोज तलाठी, किरण कानानी तसेच पालकदेखील मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धारू, शिक्षिका सारिका सूर्यवंशी, शुभदा संगमनेरकर, भाग्यश्री सुनार, उमेश तळेकर यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.