पुणे | सध्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुका येणाऱ्या २६ फेब्रुवारीला पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात तयारी सुरु असताना जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी यांनी डिजिटल मिडीयाला मात्र पासेस नाकारण्यात आले आहे. त्यामुळे डिजिटल मिडीयामध्ये नाराजी आहे.
यापूर्वी झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीस डिजिटल मिडियाला मतदान, मतमोजणी संदर्भात शासकीय स्तरावरून तसेच निवडणूक आयोगाच्या स्तरावरून पासेस देण्यात आले होते.
आता कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीतील मतदान, मतमोजणी पासेससाठी जिल्हा माहिती कार्यालयाने फोटो आणि पासेस मागविले होते मात्र आज त्यांच्या कार्यालयातून डिजिटल मिडीयाला पासेस नाकारल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामागे अद्याप काही कारण सांगण्यात आले नाही.
दरम्यान, डिजिटल मिडियाला आवश्यक ते निकष जरूर लावावेत मात्र डिजिटल मिडियाला वार्तांकनासाठी सहाय्य करावे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षीत केलेल्या डिजिटल इंडिया मधील डिजिटल मिडियाला भक्कम करण्यासाठी निराश करणार नाहीत अशी आशा व्यक्त करत डिजिटल मीडिया एडिटर जर्नालिस्ट असोसिएशनचे सदस्य शरद लोणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन दिले आहे.