मुंबई | भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक फोटो ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. गाडीवर उभं राहून काही होत नसतं. बाळासाहेबांची कॉपी केली म्हणजे बाळासाहेब ठाकरे होता येत नाही.
तसेच, बाळासाहेब ठाकरेंनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला. तर कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत, कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघाताने स्वतःच सत्तेवर बसले अशी तुलना करणारं ट्विट उपाध्ये यांनी केलं आहे.
एका बाजूला कारच्या बॉनेटवर उभे असलेले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असा फोटोही त्यांनी ट्विट केला आहे.