पुणे | आज ठाकरे-शिंदे गटाचे नेते आमने सामने आले आहेत. पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर ठाकरे आणि शिंदे गटात झटापट झाली आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी एकत्र आले. पोलिसांकडून हा सगळा हैदोस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम निर्णय दिला. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळाला आहे.
दरम्यान , ठाकरे गटात नाराजी दिसून येत आहे. तर शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. शिंदे गटातील कार्यकर्ते तसेच उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचा देखील यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे.