मुंबई | काल निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम निर्णय दिला. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळाले आहे. चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शिंदे गटात जल्लोष साजरा करण्यात येतोय. तर, या निर्णयाविरोधात ठाकरेगटाने खरी लढाई तर आता सुरू झाली असे म्हणत रणशिंग फुंकले आहे.
उद्धव ठाकरेंनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शैली वापरली आहे. १९६९ साली बाळासाहेबांनी कारच्या बोनेटवर उभ राहून भाषण केले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याच पावलावर पाउलं ठेवत मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले. माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झाली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.