नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला शिवसेनेच्या चिन्हाचा प्रश्न अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. धनुष्यबाण कोणाच हे अखेर ठरलं आहे. शिंदे गटाला हे चिन्ह मिळाल्याने शिंदे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निकाल गेले अनेक दिवस प्रलंबित ठेवला आहे. तसेच विरोधकांकडून यावर जोरदार टीका देखील करण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा खोक्यांचा विजय सत्याचा विजय नाही असे म्हटले आहे.