बांगलादेशामध्ये उसळलेला हिंसाचार आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे बांगलादेशातील राजकारणात मोठा भूकंप आलाय. देशातील परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेल्याने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन ढाका पॅलेस सोडून देशही सोडावा लागलाय. शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार करण्यास कारणीभूत ठरलाय तो एक ३२ वर्षीय विद्यार्थी नेता. कॉलेजच्या पोरानं शेख हसीना यांची सत्ता हादरवून टाकली. मुळात बांगलादेशामध्ये जे आंदोलन पेटलं ते विद्यार्थ्यांमुळे आणि या आंदोलनाचा नेता आहे ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी नाहिद इस्लाम. नाहिदने बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व केलं. या आंदोलनाची धग इतकी तीव्र होती की, शेख हसीना यांचं साम्राज्यचं संपुष्टात आलं आहे. शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावणारा हा नाहिद इस्लाम नेमका आहे तरी कोण हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.