नवी दिल्ली | दिवाळीचे निमित्त साधून मोदी सरकारने (Modi Government) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employees) मोठे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस (Diwali Bonus) दिला जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिली.
अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या विविध निर्णयांची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, रेल्वेच्या 11.27 लाख कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपयांचा ‘प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस’ दिला जाणार आहे. त्याची कमाल मर्यादा 17,951 रुपये असणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यासाठी रेल्वेवर 1832.09 कोटी इतका बोजा पडणार आहे. यासाठी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘पीएलबी’ पेमेंट म्हणून दरमहा 7000 रुपये दिले जातात. तसेच 78 दिवसांनुसार कर्मचार्यांना बोनस म्हणून 17,951 रुपये दिले जातील.
दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस हा प्रोत्साहन कामासाठी दिला जातो. केंद्राने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देण्याची घोषणा केल्याने या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.