देहरादून | केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिराची दार हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद करण्यात आली आहेत. या कालावधीमध्ये देवी यमुनेची पूजा उत्तरकाशीमधील खारसाली इथे करण्याची प्रथा आहे.
केदारनाथचे दरवाजे बंद झाल्यावर भगवान केदारनाथला चल विग्रह डोली ऊखीमठला नेल जात. तर ओंकारेश्वर मंदिरामध्ये पुढचे सहा महिने बाबा केदार यांची पूजा केली जाते.
पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्याकरिता, देवदर्शनाकरिता घराबाहेर पडत असतात. त्यामध्ये शिवभक्त केदारनाथकडे आपली वाट धरत असतात.
दरवाजे बंद करण्यापूर्वीची पूर्ण तयारी झाली होती. प्रत्येक वर्षी भाऊबीजच्या दिवशी बाबा केदारनाथची यात्रा सहा महिन्यांसाठी बंद केली जाते. यामागे ऐतिहासिक कथा प्रचलित आहे.
दरम्यान, आतापर्यंत ६.१२ लाख भक्तांनी केदारनाथचे दर्शन घेतले आहे. तर केदारनाथचे दरवाजे उघडण्याचा निर्णय हा प्रत्येक वर्षी शिवरात्रीला घेतला जातो.