मुंबई | काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला राज्यातून चांगला पाठिंबा मिळत आहे. पण आता याच यात्रेवरून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देशभरात काँग्रेसने जनाधार मिळवण्याचे ध्येय हाती घेतले आहे. त्यानुसार, अगदी सर्वसामान्यांची देखील राहुल गांधी हे भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या या यात्रेत सर्वसामान्य जनता सहभागी होताना दिसत आहे. मात्र, तामिळनाडूतून निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकवण्याची चर्चा होती. यादरम्यान हाणामारीचे प्रकरण समोर आले आहे.
यावरूनच भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले की, ”बातमी तामिळनाडूमधील आहे पण काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे पितळ उघडे पाडणारी आहे…तिथे दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि इथे अभंग भारत जोडायला निघाले आहेत.