मुंबई | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी आग लावण्याचे काम करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे (उ.बा.ठा.) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वादंग निर्माण होताना दिसत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून सीमाप्रश्नावर विधाने केली जात आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, चीनने जगभरात घुसखोरी सुरु केली आहे. त्याच पद्धतीनं कर्नाटक राज्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं हे बोम्मई मानायला तयार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेनं बोम्मई यांच्या विरोधात ठराव करुन तो मंजूर केला पाहिजे असेही राऊत म्हणाले