टेक्सास | आपण कधीतरी पैसे चुकून कोणाला तरी आल्याचे पाहिले, ऐकले असेलच. काही लोक चुकून आलेले पैसे परत करतात तर काही ते पैसे खर्चही करतात. अशी एक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या खात्यात एक-दोन नाहीतर तब्बल 270 कोटी चुकून आले.
अमेरिकेच्या टेक्सास येथे या महिलेचे दुकान आहे. महिलेच्या बँक खात्यात पैसे पहिल्यांदा आल्यावर तिला वाटलं की तिच्या नातेवाईकांकडून किंवा परिचयाच्या व्यक्तीकडून आलेले असावेत. पण या पैशांबाबत बँकेकडे विचारणा केली असता बँकेने चुकून पैसे ट्रान्सफर झाल्याचे सांगितले. याची माहिती मिळाल्यावर महिलेने आलेली संपूर्ण रक्कम पुन्हा बँकेकडे सुपूर्द केली.
पैसे खर्च करायचेही होतं ठरवलं
जेव्हा या महिलेला समजले की खात्यात इतकी मोठी रक्कम आली. तेव्हा तिने ही रक्कम खर्च करण्याची योजनाही आखली. त्यामध्ये तिने चर्चमध्ये 10 टक्के दान करण्याचे ठरवले. तर यातील काही रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचे ठरवले.