नवी दिल्ली | चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर आता भारत सरकारही सतर्क झाले आहे. त्यानुसार गाईडलाईन्स पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने यावर कडक उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार, मास्कचा वापर पुन्हा सुरु करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच आता इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील देशातील नागरिकांसाठी सल्ला दिला आहे.
त्यामध्ये ‘आयएमए’ने म्हटले की, नागरिकांनी लग्न सोहळा, राजकीय कार्यक्रम किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक मेळावे टाळावेत. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.