मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिकेच्या दमदार कथानकामुळे आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे ही मालिका चांगलीच गाजली आहे. या मालिकेचं कथानक आता अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे ज्यात प्रेक्षकांना आणखीनच उत्सुकता लागून राहणार आहे. आशुतोषच्या वाढदिवसी अरुंधती त्याच्याबाबत मोठा निर्णय घेणार होती. मात्र, अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. अनुष्का ही आशुतोषची खूप जुनी मैत्रीण आहे. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. त्यामुळे तिच्या एण्ट्रीने मालिकेत मोठा ट्विस्ट येणार हे नक्की.
या मालिकेत अनुष्काची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे साकारणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना मी या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे ‘आई काय करू शकते’ याचा अनुभव मी घेतच आहे. त्यामुळे मला जेव्हा अनुष्काच्या भूमिकेसाठी विचारलं गेलं, तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. असे स्वरांगी म्हणाली.
“कुटुंबीयांची साथ असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. तू सध्या काय करतेय हा प्रश्न मला गेल्या कित्येक दिवसांपासून विचारला जायचा. आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की मी लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये अनुष्का ही भूमिका साकारतेय.”
अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात कोणतं वळण येणार हे येणाऱ्या मैल्केमध्ये कळेलच.