मुंबई | गेल्या काही दिवसांपासून साऊथ चित्रपटांच्या तुलनेत बॉलीवूड चित्रपट काही खास कमाई करू शकले नाही. बॉलीवूडचे चित्रपट सातत्याने फ्लॉप जाताना दिसून येत आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या स्टार कलाकारांचे देखील चित्रपटाचे हेच हाल आहे. यामुळेच बॉलीवूडचे चित्रपट निर्माता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी वेगळे घेऊन येण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत. यामुळे आता बायोपिकवर अधिक भर दिल्याचे बघायला मिळतंय. त्यात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक तयार केली जाणार आहे.
यापूर्वी विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींवर बायोपिक तयार केली होती. मात्र, यावेळी अक्षय कुमार याचा टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपटाच्या प्रोड्यूसर प्रेरणा अरोडाने ही घोषणा केली आहे. प्रेरणा अरोडा म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक जबरदस्त चित्रपट नक्कीच बनेल. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांच्या चित्रपटात कोणता अभिनेता हा मुख्य भूमिकेत असेल यावर देखील त्यांनी खुलासा केला.
नरेंद्र मोदी यांची भूमिका अमिताभ बच्चन हे साकारणार असल्याचे प्रेरणा अरोडाने स्पष्ट केले. अमिताभ बच्चन नरेंद्र मोदी यांची भूमिका इतरांपेक्षा अधिक खास साकारू शकतात, असेही त्या म्हटल्या आहे.
नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाहीय. यावर काम सुरू झाल्याचे यावेळी प्रेरणा अरोडा म्हटल्या आहेत. इतकेच नाही तर ‘देशाचे खरे अॅक्शन हिरो’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असून मी त्यांची खूप जास्त मोठी चाहती आहे. नरेंद्र मोदी यांच्या ड्रेसिंगबद्दल कौतुक देखील त्यांनी केलं.
दरम्यान, बॉलीवूडवर सतत नेपोटिझमचा आरोप केला जातो. अनेकांनी तर थेट बॉलीवूडकडे चित्रपटाच्या चांगल्या स्टोरीच राहिल्या नसल्याचे देखील म्हटले आहे. यामुळे बिग बजेटचे चित्रपट रिलीज करण्याच्या अगोदर निर्मात्यांना दहा वेळा विचार करण्याची वेळ येतंय.