नवी दिल्ली | जेव्हा आपण एखाद्याला फोन करतो तेव्हा आपल्याला भीती असते की आपला फोन कोणी रेकॉर्ड तर करत नसेल ना…त्यामुळे अनेकदा आपण सावधगिरी बाळगतो. मात्र, आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून कळेल की तुमचा फोन रेकॉर्ड केला की नाही ते. पण त्यासाठी तुम्हाला खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सध्याच्या नव्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करताना अनाउंसमेंट ऐकू येते. मात्र, काही जुन्या फोन्समध्ये अनाउंसमेंट होत नाही आणि रेकॉर्डिंग व्हायला सुरुवात होते. त्यामुळे फोन रेकॉर्डिंग होतंय की नाही, हे समजणे अवघड होते.
या गोष्टीकडे द्या विशेष लक्ष
बीप साऊंड
फोन सुरु असताना तुम्हाला बीप साउंडकडे लक्ष द्यायला हवे. जर फोन सुरु असताना बीप-बीप आवाज येत असेल तर समजून जा की तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. पण जर कॉल रिसिव्ह केल्यानंतर काही कालावधीनंतर बीप आवाज येत असेल तर कॉल रेकॉर्डिंग होत असल्याचा इशारा समजा.
दुसऱ्या आवाजाकडे लक्ष द्या
जेव्हा तुमचा फोन सुरु असताना बीपच्या ऐवजी मोठा बीप किंवा दुसरा कोणता आवाज येत असेल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण या माध्यमातून तुमचा कॉल रेकॉर्ड केला जाण्याची जास्त शक्यता असते. यातूनही कॉल रेकॉर्ड केला जात आहे की नाही याची माहिती घेता येऊ शकते.