लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडतर्फे विजय भंडारींचा अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा
पुणे | लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड ट्रस्टचे चेअरमन विजय भंडारी यांचा आज ५६वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने ५६व्या वाढदिवसानिमित्त ५६ लाख रुपयांचे उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केला.
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या विजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विजय भंडारी यांना वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने ५६ लाख रुपयांचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी राजेश सांकला, चेतन भंडारी, श्याम खंडेलवाल, मनोज छाजेड, मंगेश कटारिया, सचिन जैन, महेंद्र गदिया, महेंद्र सुंदेशा,विजय भंडारी मित्र परिवार, आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.
विजय भंडारी यांनी लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड, जीतो, युगल धर्म संघ, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टसह अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग-व्यापार, क्रीडा, शिक्षण, आरोग्य व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. विजय भंडारी मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विजय भंडारी यांचा ५६ वा वाढदिवस असल्याने लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने ५६ लाख रुपयांच्या उपक्रमांची घोषणा केली.
वाढदिवसानिमित्त ५६ लाखांची मदत
विजय भंडारी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ लाख रुपयांच्या मदतीचे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृद्धाश्रमास २५ बेड, मुकबधिर शाळेला २०० गणवेश, १०० शाळांना ई-लर्निंग अभ्यासक्रम भेट देण्यात आली. याबरोबरच वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण 112 बाटल्या रक्त संकलित झाले आहे. तसेच येणाऱ्या वर्षात दररोज 200 लोकांना अन्नदान केले जाणार आहे.