पुणे । लायन्स सखी मंच तर्फे नवरात्र उत्सव निमित्त रास दांडिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला .लायन्स सखी मंचच्या चेअरपर्सन लायन भारती भंडारी, सखी मंच कोऑर्डिनेटर लायन सुवर्णा दोशी, सखी मंचच्या सचिव लायन सुजाता शाह, ट्रेझरर लायन शीतल गादिया, लायन प्रियंका परमार व टीम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.
लायन्स सखी मंचमध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक महिलांनी आपली नाव नोंदणी केली आहे.यावेळी लायन्स सखी मंचच्या सदस्यांनी केलेल्या उत्कृष्ट पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.गरबा नृत्य करत महिलांनी रास दांडियाचा आनंद लुटला. यावेळी सखी मंचच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गणपती आरास स्पर्धा विजेत्या बेस्ट फॅमिली फोटो – स्वाती पोदार,रीलसाठी जास्तीत जास्त फॉलोअर्स – अलका खंडेलवाल, इको फ्रेंडली गणपती आरास – लीना गायकवाड, सजावट कौशल्य आणि कल्पकता – सीमा पारेख, मूर्ती कौशल्य आणि कल्पकता – प्रतिभा निकम तसेच कंसोलेनशन प्राईज गीतांजली धांडेकर व मनीषा जगताप यांना मिळाले. कविता पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक रश्मी अग्रवाल यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक संगीता देवी यांनी पटकावला.गणतपी आरास स्पर्धेचे परीक्षक लायन रवी कुस्तुले,लायन सोनल राजोरे हे होते. गणतपी आरास स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व लायन सदस्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तर रास दांडियाचे परीक्षक म्हणून जेनिका शहा परदेशी व युक्ती जेठवानी या होत्या. बेस्ट मेल फिमेल व बेस्ट ग्रुप अशा प्रकारात बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी आणि गिफ्ट देण्यात आले.
लायन प्रीतम गांधी व लायन सुजाता शहा यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी, सीईओ लायन श्याम खंडेलवाल, खजिनदार लायन राजेंद्र गोयल, DG विझिट चेअरपर्सन लायन सतीश राजहंस, लायन सुनील चेकर, लायन विजय जाजू, लायन शरद पवार, लायन दीपक लोहिया सर्व कोअर टीम तसेच लायन महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लकी ड्रॉ स्पॉन्सरर लायन भारती भंडारी होत्या. इंडस्ट्रियालिस्ट अनिल मित्तल,गांधी ज्वेलर्सचे आशिष गांधी व लायन कविता हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
लायन्स सखी मंच तर्फे महिलांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येत असते.त्याचाच एक भाग म्हणून रास दांडियाचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला.