पुणे । महाराष्ट्रात सांडगे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा पदार्थ बनवला जातो. काही ठिकाणी याला वडी म्हणतात तर काही ठिकाणी सांडगे म्हटले जाते. वाळवून झाल्यानंतर सांडग्याची भाजी किंवा आमटी करता येते.सांडगे बनवण्यासाठी विविध डाळींचा वापर केला जातो. सांडग्यांची भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर चविष्ट लागते. हेच वैशिष्ट्यपूर्ण विविध प्रकारच्या डाळींपासून बनवलेले सांडगे व जामखेडची प्रसिद्ध खरवडी पुण्यात भरवण्यात आलेल्या भीमथडी जत्रेत पाहायला मिळाली. जामखेडच्या पवार दाम्पत्याने विक्रीस आणलेल्या घरगुती व पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या या साठवणीच्या पदार्थांनी लक्ष वेधून घेतले.