अनेक चिन्हांवर लढण्याचा अनुभव गाठीशी !
जवळपास 5 दशकांहून अधिक काळ शरद पवार राजकारणात कार्यरत आहेत. या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याभोवती फिरत आलं आहे. मग ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत..शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकरणात महत्वाचा मानला गेलाय. आजही वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार रिलेव्हन्स ठेवून असतील तर, त्यांच्यातील मुरब्बी राजकारणी किती जिवंत आहे हे लक्षात येतं.शरद पवारांना धोबीपछाड दिल्याशिवाय महाराष्ट्राचा गड जिंकता येणार नाही हे भाजपाला समजल्यामुळं त्यांनी शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी सुरुवातीला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे. तर, त्यानंतर शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ असं नाव निवडणूक आयोगाकडून मिळालं आहे. जे उद्धव ठाकरेंसोबत झालं तेच शरद पवार यांच्यासोबत झाल्याची भावना जनमाणसांतून प्रकट होताना दिसत आहे.आपण स्थापन केलेला पक्ष आपलाच पुतण्या फोडतो आणि त्यावर हक्क सांगतो आणि निवडणूक आयोग देखील तशाच प्रकारचा निर्णय देतो हा शरद पवार यांना धक्का मानला जातोय. असं जरी असलं तरी पक्ष किंवा चिन्ह जाणं हे शरद पवारांसाठी काही नवं नाही… त्यांनी स्वतःदेखील अनेकदा याविषयी भाष्य केलं आहे.अनेक चिन्हांवर आणि पक्षांच्या नावावर त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. हा सगळा इतिहास नेमका कसा होता हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात…