शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते हे गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिले आहेत.मात्र राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता राजकारणात कितीही कट्टर वैरी असलेले पुन्हा कधी एकत्र येतील हे सांगता येत नाही.त्याची अनेक उदाहरणं देखील आहेत..आणि असाच काहीसा प्रकार शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते यांच्यात देखील घडला.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलीप मोहिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.आता एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी न सोडणाऱ्या आणि अगदी टोकाचे मतभेद असलेल्या मोहिते आणि आढळराव पाटील यांना दिलजमाई का करावी लागली.मोहिते-आढळराव एकमेकांचे कट्टर वैरी नेमके झाले कसे? त्यांच्यातील वैर काय आहे? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करुन घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातंय आणि याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील कट्टर राजकीय वैरी असलेल्या आमदार दिलीप मोहिते यांना भेटले. राजकारणात कोणी कितीही कट्टर वैरी असला तरी सत्तेसाठी, पदासाठी पुन्हा कधी एकत्र येईल हे सांगता येत नाही.शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात देखील असंच होईल का? हे आपल्याला नजीकच्या काळात समजेलच.