शिर्डी | प्रशासनातील अधिकारी राजकारणात येणं काही नवीन नाही. श्रीनावास पाटील यांच्यापासून अनेक IAS, आयपीएस अधिकाऱ्यांनी निवडणूक लढवली आहे… राज्य सेवेतील अधिकारी देखील निवडणुका लढलेत आणि जिंकलेत देखील. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात एक वेगळाच योग घडून येईल असं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे राज्याच्या ग्रामविकास खात्यातील तीन अधिकारी एकाच वेळेस राजकारणात वेगवेगळ्या पक्ष्यात सक्रिय आहेत. त्यातील एक खासदार राहिलेत, एक आमदार आहेत, तर एक नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहेत. हे अधिकारी नेमके कोण आहेत ? राज्याचा ग्रामविकास विभाग आणि याच विभागातून राजकारणात येणारे अधिकारी हे कनेक्शन नेमकं काय आहे ? या व्हिडिओतून जाणून घेऊयात…