६ खासदारांचा पत्ता कट करण्यासाठी शिंदेंवर दबाव
महायुतीतील जागावाटपाचा पेच अद्यापही कायम आहे. भाजपकडून अतिशय कमी जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बोळवण केली जात असतानाच लोकसभेच्या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्त्वाकडून एकनाथ शिंदेंकडे करण्यात आली आहे. याबद्दल एकनाथ शिंदेंचं मत प्रतिकूल असल्याचं समजतं. पण भाजपकडून शिवसेनेवर दबाव वाढला आहे. ते सहा खासदार नेमके कोण आहेत ज्यांना पुन्हा तिकीट देण्यावर भाजपचा का नकार आहे.या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
कोल्हापुरातून समरजीत घाटगे किंवा धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपनं शिंदेंकडे केली आहे. दोघेही भाजपचे नेते आहेत. हातकणंगले लोकसभेसाठी भाजपनं विनय कोरेंच्या नावाचा आग्रह धरला. विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक असून ते विधानसभेचे आमदार आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार शिंदेंसोबत आहेत. भाजपच्या मागणीप्रमाणे उमेदवाऱ्या दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं, असा प्रश्न शिंदेंसमोर असेल. त्यामुळे शिंदे भाजपच्या मागण्यांबद्दल फारसे अनुकूल नसल्याची स्थिती आहे.आता एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव तर वाढलेला आहे यातून ते दबावाला बळी पडणार कि आणखी काही वेगळा निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.