राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५. ८१ टक्के इतका लागला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात वाढ झाली असली तरी या निकालामधून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे..मातृभाषा असलेल्या मराठी विषयात तब्बल ३८ हजार विद्यार्थी नापास झाले आहेत.इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या ही सहापटीने जास्त आहे.आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना देखील हजारो विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या विषयातच गंटागळ्या का खाल्ल्या? पाहुयात याबातचा हा स्पेशल रिपोर्ट.