पुणे | कसबा पेठ आणि चिंचवडच्या विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. आज भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपकडून कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकांचे २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच निकाल २ मार्च रोजीच लागणार आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात या निवडणुकांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. यामध्ये ही निवडणूक बिनविरोध होण्याचे देखील म्हटले जात होते, परंतु इतर घटक पक्षांनी निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.