इन्स्टाग्राम स्टॅनला देतात ‘हे’ मानधन
मुंबई | ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा रॅपर एमसी स्टॅन विजेता ठरला. पुण्यातील एमसी स्टॅनने सर्वाधिक मत मिळवत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर त्याची लोकप्रियता त्याच्या इन्स्टाग्राम लाइव्हमधून दिसून आली.
पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसाठी एमसी स्टॅनने गुरुवारी केवळ १० मिनिटेचं इन्स्टाग्राम लाइव्ह केलं होतं. या लाइव्हमध्ये त्याने त्याचं गाणं गायलं. १० मिनिटांसाठी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये स्टॅनला तब्बल ५ लाख ४१ हजार चाहते पाहत होते. इन्स्टा लाइव्हला इतके जास्त व्ह्यूज मिळणारा स्टॅन पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. शाहरुख खानचा विक्रम मोडून स्टॅनने नवा विक्रम रचला आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाइव्हला २ लाख ५५ हजार व्ह्यूज मिळाले होते.
एमसी स्टॅनच्या लाइव्हचा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप १० लाइव्हमध्ये समावेश झाला आहे. या इन्स्टा लाइव्हचा स्टॅनलाही प्रचंड फायदा झाला आहे. रॅपर एमसी स्टॅन पूर्वी एका इन्स्टाग्राम स्टोरीसाठी ५-७ लाख रुपये मानधन घ्यायचा. आता त्याला इन्स्टा स्टोरीसाठी ८-१० लाख रुपये मिळतात. तर एका रीलसाठी स्टॅनला १८-२३ लाख रुपये मिळायचे. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर स्टॅनच्या रीलसाठीच्या मानधनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
‘बिग बॉस’चं विजेतेपद मिळवल्यानंतर एमसी स्टॅनचं नशीब उजळलं आहे. स्टॅनला अॅमेझॉन मिनी टीव्हीची ऑफर मिळाली आहे. या अॅमेझॉनसह स्टॅनने करारही केला आहे. याशिवाय इतर २० ब्रँडच्या ऑफरही स्टॅनला मिळाल्या असल्याची माहिती आहे. एमसी स्टॅनचे मॅनेजर अपूर्व भटनागर यांनी ही माहिती दिली आहे.