सिंधुदुर्ग | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्तांतरानंतर पाहिलास दौरा आहे. अंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी जरी त्यांचा हा मर्यादित दौरा असला तरी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीतरी देऊन जातील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सामंत हे सिंधुदुर्ग विमानतळावर होते. यावेळी त्यांनी संवाद साधला. भराडी यात्रेला एक पारंपारिक स्वरूप आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंगणेवाडी, कुणकेश्वर परिसराचा विकास, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेच्या मनातील काम करत आहे. दोघेही मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काहीतरी भरीव तरतूद करतील याची मला त्यांचा एक सहकारी म्हणून खात्री आहे, असेही सामंत यांनी म्हटलं आहे.