नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) हे 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. आता त्यांच्या जागी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Y. Chandrachud) यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरन्यायाधीश म्हणून पुन्हा एकदा मराठीला माणसाला मान मिळणार असल्याची चर्चा आहे.
उदय लळीत यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे ललीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत उदय ललीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले आहे.
दरम्यान, विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास केंद्र सरकारने सांगितलं होतं. यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे.