अमरावती | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा विजय झाला. खर्गे हे अध्यक्षपदी विराजमान होताच पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावध वक्तव्य केले आहे. ‘काँग्रेस अध्यक्षाकडे पक्षाचे सर्वोच्च अधिकार आहेत. पक्षातील प्रत्येक सदस्य अध्यक्षाला रिपोर्ट करेल. पक्षाचे नवीन अध्यक्ष माझी पक्षातील भूमिका ठरवतील’, असे ते म्हणाले.
आंध्र प्रदेशातील अडोनीण येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षाकडे पक्षाचे सर्वोच्च अधिकार आहेत. पक्षातील प्रत्येक सदस्य अध्यक्षाला रिपोर्ट करेल. पक्षाचे नवीन अध्यक्ष माझी पक्षातील भूमिका ठरवतील. तुम्ही मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधींना विचारू शकता’.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निकालापूर्वीच राहुल गांधी यांनी विधान केले होते. त्यामध्ये ‘ज्या कोणाची निवड होईल, तो ठरवेल. खर्गे आणि थरूर हे अफाट अनुभव आणि समजूतदारपणा असलेले लोक आहेत, त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही.’