पुणे | लायन्स इंटरनॅशनल ही संस्था एकूण २०४ देशात सेवाकार्य करत आहे ज्यात सुमारे १५ लाखांहून अधिक सभासद आहेत त्यातील डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने येत्या १८ व १९ मे रोजी पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये कॅबिनेट इन्स्टॉलेशन, डायबेटीस रन, लेडीज प्रीमिअर लीग, पीएसटी पिकनिक, लॉयल्टी कार्ड, मन की बात यांसह असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. सिग्नेचर ऍक्टिव्हिटी अंतर्गत आतापर्यंत 1,282 सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. 40 पाण्याच्या टाक्या, 20 डिजिटल बोर्ड आणि 13 डेंटल क्लिनिक उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून जवळपास ४०० हून अधिक महिलांसाठी सखी मंच सारखे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले. ज्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम चालवले जातात.
त्याचबरोबर डिस्ट्रिक्टमधील क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी याशिवाय प्रत्येक क्लबने राबवलेले समाजहिताचे उपक्रम अधिकाधिक वाढावे या हेतूने लायन्स न्यूज चॅनल सुरु करण्यात आला. सर्व क्लबच्या माध्यमातून ऑक्टोबर सर्विस विक साजरा करण्यात आला…त्याचबरोबर वृक्ष लागवड, टाक्या शुद्धीकरण, वृद्धाश्रमातील नागरिकांची सेवा, वृक्ष लायब्ररी, तळ्यातील गाळ काढणे असे अनेक प्रकल्प डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत…गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यासोबतच येणाऱ्या काळातील लायनिझमचे धोरण कसं असेल याविषयी देखील माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन प्रांतपालांची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे.
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रांतातील एकूण ७२ क्लबला भेट देऊन क्लबचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर या वर्षभरात डिस्ट्रिक्टमध्ये एकूण ८१२ नवीन सदस्यांना सामील करण्यात आले. आता डिस्ट्रिक्टची एकूण सदस्य संख्या ६,३८१ वर पोहोचली आहे. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या उपक्रमांमध्ये त्यांना डिस्ट्रिक्टचे सीईओ लायन श्याम खंडेलवाल, कॅबिनेट सचिव लायन अशोक मिस्त्री, कॅबिनेट खजिनदार एमजेएफ लायन राजेंद्र गोयल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
‘विजयगाथा’ या कार्यक्रमांतर्गत बिझनेस सेशन, क्लब बॅनर सादरीकरण, लायन्स गॉट टॅलेंट असे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. १८ मे २०२४ रोजी या कॉन्फरन्सचे उद्घाटन पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन प्रेमचंद बाफना यांच्या हस्ते होणार आहे तर १९ मे २०२४ रोजी मोटिवेशनल स्पीकर सोनू शर्मा यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन डॉ. विनोद कुमार लाडिया आणि सिनिअर वकील एस.के.जैन यांच्यासह डिस्ट्रिक्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व क्लबचे पदाधिकारी, पुणे, नाशिक आणि अहमदनगर झोनमधील सभासद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.