डब्लिन | जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गाड्यांच्या वापरामुळे प्रदूषणातही मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता युरोपात नवीन पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या विक्रीवर 2035 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय युरोपियन संसद आणि युरोपियन युनियनच्या (EU) सदस्य राष्ट्रांनी घेतला आहे. याबाबतचा करारही त्यांनी केला आहे.
युरोपात जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हा करार केला आहे. युरोपियन संसदेच्या माहितीनुसार, हा करार म्हणजे युरोपियन युनियन त्याच्या हवामान कायद्यात निर्धारित केलेली महत्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे दाखवून देणारा आहे. EU डेटानुसार, वाहतूक हे एकमेव क्षेत्र आहे जिथे गेल्या तीन दशकांमध्ये प्रदूषण वाढले आहे. 1990 ते 2019 दरम्यान वाहतूक उत्सर्जन 33.5 टक्क्यांनी वाढलं आहे.
दरम्यान, वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हा करार करण्यात आला आहे. त्यानुसार, पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या विक्रीवर 2035 पर्यंत बंदी असणार आहे.