केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक
पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन
पुणे | भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतच्या वाटचालीतील मोदी सरकारची 9 वर्षे ही सुवर्ण वर्षे आहेत. त्यांच्या या काळात जेवढं काम झालं तेवढं काम कधीच झाले नाही, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे.
पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित व्यापारी स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मौर्य बोलत होते. बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे हा मेळावा संपन्न झाला. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाले त्यांच्या या 9 वर्षाच्या कार्यकाळात अनेक योजना देशभरात राबवण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर मोदी @ 9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात आले आहे. या निमित्त प्रमुख व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार अमर साबळे, राजेश पांडे, सुनील कांबळे, पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष जैन, उमेश चोधरी, कौस्तुभ दवडगे, पंकज उणेचा, कल्पेश ओसवाल,अंकित जैन, दत्ता सावंत यांच्यासह पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे पदाधिकारी आणि मान्यवर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदी @ 9 ही मोहीम देशभरात राबवण्यात येत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री, आमदार, पदाधिकारी यांनी एकत्र येऊन तळागाळातील लोकांना मोदीजींचे या 9 वर्षातील कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे यामागचे मूळ उद्दिष्ट आहे. मोदींच्या कामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण येथे जमले आहोत. GST (वस्तू आणि सेवा कर ) सारखा क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतला. २०२३ मध्ये रेकॉर्ड ब्रेक संकलन हे GST मुळे झाले आहे. वन नेशन वन टॅक्स हा कायदा लागू केल्यानंतर त्याचा सर्वात जास्त फायदा आपल्या देशात झाला आहे. आज व्यापारी सहजतेने ऑनलाईन व्यवहार करू शकतो. डिजिटल इंडियाची दुसरी योजना म्हणजे सर्वदूर ऑप्टीकल केबल टाकण्यात आली. देशात केवळ २ मोबाईल कंपन्या होत्या आज देशात १२० झाल्या आहेत त्यामध्ये 5G सेवेचा आपल्याला लाभ घेता येतोय. हे फक्त मोदीजींमुळे घडू शकले. त्यानंतर युपीआय ही कल्पना देखील त्यांनी आपल्या समोर आणली, असेही मौर्य यांनी सांगितले.
मोदी हैं तो मुमकिन हैं – मौर्य
जो उत्साह भगवान श्रीराम यांच्या सेनेत पाहायला मिळाला होता तितकाच उत्साह आज व्यापारी लोकांमध्ये पाहायला मिळाला. मोदींच्या नेतृत्वात 9 वर्षातच खूप विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे मोदी है तो मुमकिन है हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी व्यापारी, युवा, शेतकरी अशा सगळ्यांचा विचार केला आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे राज्य आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला भाजपला निवडून देणे आपल्या हातात आहे. कारण आपण सरकार आणू पण शकतो आणि सरकार पाडू पण शकतो. व्यापारी लोकांसाठी नरेंद्र मोदी यांनी खूप काही केले आहे.
- केशव प्रसाद मौर्य (उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश)
व्यापारासाठी मोठं योगदान – मुळीक
व्यापाऱ्यांचे सुख-दुःख मला दोन्ही माहिती आहे. देशाचे प्रत्येक क्षेत्र ज्यामध्ये आपण पुढे चाललो आहे, त्यामध्ये मोदीजींचे मोलाचे योगदान आहे. या देशाला २०२७ पर्यंत पूर्णतः आत्मनिर्भर करण्याचे उदिष्ट आहे आणि मला अभिमान आहे की मी ज्या पक्षासाठी काम करतोय तो पक्ष जनतेसाठी काम करतोय. ५६ इंचाची छाती असणारा पंतप्रधान आपल्या देशाला आहे त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. २०२४ मध्ये आपल्याला पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचे आहे. भारतासाठी मोदी महत्वाचे आहेत.
- जगदीश मुळीक (शहराध्यक्ष, भाजप, पुणे शहर)
मोदींमुळे व्यापार आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त झाला – महेंद्र व्यास
जेव्हा या डिजिटल पेमेंटची घोषणा झाली तेव्हा अनेकांनी विचारलं हे कस शक्य होणार एक गरीब महीला, भाजीवाले हे मोबाईल कुठून आणणार? इंटरनेट कुठून आणणार पण आज जर पाहिलं तर अभिमान वाटतो पान टपरीवर देखील UPI पेमेंट केलं जात. जे 40 वर्षात कोणी केलं नाही ते 9 वर्षात मोदींनी करून दाखवलं. देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या रूपात ओळख मिळाली. अशा अनेक प्रकारच्या योजना केवळ मोदीजींमुळे शक्य झाल्या.
- महेंद्र व्यास (अध्यक्ष, पुणे शहर भाजप व्यापारी आघाडी)
मोदी सरकारचे पारदर्शक काम – संतोष जैन
मोदींची जी पारदर्शकपणे काम करण्याची जी शैली आहे त्यामुळे मी भाजपसोबत जोडलो आहे. त्याचबरोबर जीएसटी, वृध्द पेन्शन योजना अशा अनेक योजना आहेत ज्या नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहेत.
- संतोष जैन (वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर भाजप व्यापारी आघाडी)