पुणे | मेडि जैन या संस्थेच्या वतीने कोरियंथन क्लब येथे पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देविचंद जैन यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, तुषार भाई दोशी, पूना हॉस्पिटलचे ट्रस्टी डाह्याभाई शहा, राजेश शहा, पुरुषोत्तम लोहिया, नैनेश नंदू, इंदर जैन, मेडी जैन संघटनेचे चेअरमन डॉ. हसमुख गुजर यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
पुण्यातील डॉक्टरांनी मेडि जैन ही संस्था ३६ वर्षांपूर्वी सामाजिक कार्यासाठी स्थापन केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील एकूण 200 ते 250हून अधिक डॉक्टर या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेमार्फत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मेडिकल कॅम्प, वारकरी कॅम्प, विविध सामाजिक कार्य, व्याख्याने, वैद्यकीय प्रशिक्षण शिबिरे इत्यादी उपक्रम मेडि जैन संस्थेच्या वतीने घेतले जातात.
डॉ. हसमुख गुजर यांची २०२३-२४ वर्षासाठी मेडि जैन संघटनेच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पार पडला. यावेळी डॉ. दिपाली गुजर, डॉ. पराग जैन, डॉ. जिग्नेश तासवाला, डॉ. अरविंद जैन, डॉ. योगेश दोशी, डॉ. संदीप लुणावत, डॉ. जानकी दोशी, डॉ. राहुल शहा, डॉ. सोनल पालरेचा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व १५० डॉक्टर्स उपस्थित होते.