पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुल हाफिज शेख यांची नुकतीच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ही निवड जाहीर होताच सोशल मीडियातून संपूर्ण महाराष्ट्रातून अब्दुल हफिज शेख यांना शुभेच्छा वर्षाव करण्यात आला. पद जाहीर होण्याच्या अगोदर अब्दुल हफिस शेख यांनी शक्तिप्रदर्शन केले होते.अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे अब्दुल हाफिझ शेख यांचे पुणे शहरात युवकांचे मोठे संघटन आहे.अब्दुल हाफिझ शेख यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पदांवर आपली महत्त्वाची पदांची जवाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पार पाडली आहे. दीपक मानकर यांनी मोहसीन हसन शेख यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी व अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष म्हणून समीर अन्सार शेख यांची निवड केली आहे.