पुणे | नुकतीच उद्धव ठाकरेंची हिंगोलीमध्ये निर्धार सभा झाली अन् या सभेत बोलताना त्यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे. फडतूस, कलंक, थापाड्या असं बोलणार नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेली टीका भाजपला चांगलीच झोंबलीय. त्यांनीही उद्धव ठाकरेंना जशास तसा इशारा दिलाय. मला असं म्हणायचं नाही पण तुमची अवस्था शोले चित्रपटातील असरानी सारखी झालीय. आधे इधर, आधे उधर और मै कडक जैलर…आम्हालाही तुम्हाला घरबश्या म्हणायचं नाही… घरकोंबडा म्हणायचं नाही…तात्या विंचू म्हणायचं नाही…अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं.
त्याचबरोबर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, त्यांना मी मुडदूस,खरबूज्या, फावड्या असं म्हणणार नाही असं वक्तव्य केलं. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना इतका मोठा उद्रेक होईल की, मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटतील असा ठाकरेंना थेट इशाराच दिला.
तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील याच शब्दात त्यांना टोला लगावला आहे. त्यांनी देखील ठाकरेंच्या या वक्तव्यावर नपुसंक, बायल्या म्हटलं तर बोभाटा होईल असं म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसं राज्यातलं वातावरण चांगलंच तापताना दिसतंय… मागच्या चार वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींचे पडसाद यापुढच्या काळातील टीकांमधून उमटणार आहेत…असंच दिसतं…