बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला मात्र, अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप काही निश्चित झालेलं नाही… महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना याबाबतची माहिती पुढे आली आहे…उद्धव ठाकरेंना २२ जागा मिळणार असून संभाव्य उमेदवारांची नावं देखील समोर आली आहेत ? आता या २२ जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि तिथून संभाव्य उमेदवार कोण असणार आहेत ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..