कोल्हापूर | ”राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) सातत्याने अशी बडबड का करतात, असा मला प्रश्न पडला आहे. त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) हात जोडून विनंती आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको”, अशा शब्दांत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत, असे विधान त्यांनी केले. त्यानंतर आता वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे, अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको.”
काय म्हणाले राज्यपाल?
‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे’, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.