मुंबई | आज उद्धव ठाकरे यांचा बारसू दौरा होता. या दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी अडीच वर्षांमध्ये साधा एक प्रकल्प कोकणसाठी आणला नाही ते आज आलेल्या प्रकल्पाला विरोध करतायत अशा शब्दांत राणेंनी ठाकरेंवर टीकास्र सोडलं.
यावेळी बारसू येथे उद्धव ठाकरे रिफायनरीच्या प्रस्तावित जागेत पोहोचले आणि ते सोलगावले गेले. त्यांच्या सभेला परवानगी नाकारली म्हणून मीही माझा दौरा रद्द केला आहे. प्रकल्प सुरु केला तर महाराष्ट्र पेटवू असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. परंतु यांनी कोकणासाठी काहीच केलेलं नाही. मुख्यमंत्री असताना ते निव्वळ निकामी होते. महाराष्ट्राला एक निकामी मुख्यमंत्री लाभला होता, ते केवळ अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेल्याचा पुनरुच्चार देखील राणेंनी केला आहे.
दरम्यान, आज शिवसेना कमी संख्या असलेला पक्ष आहे, त्यांनी कोकणात कायम विकासकामांना विरोध केला. अडीच वर्षात त्यांनी कोणताच प्रकल्प कोकणात आणला नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचं कोकणाच्या विकासात अजिबात योगदान नाही. जैतापूरच्या विरोधासाठी ५०० कोटींचा डील झाली होती. त्यांनी कोळश्याच्या उद्योगपतींकडून ५०० कोटी घेतले होते. संजय राऊत म्हणाले वाटणी झाली होती. राऊत दारु पिल्यासारखं काहीही बोलत आहेत. सध्या ठाकरे-राऊत डिप्रेशनमध्ये गेले आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव निकामी मुख्यमंत्री आहेत तर खोक्यांचं काय बोलता ‘मातोश्री’ मध्ये काय चालतं आम्हांला माहिती आहे अशा अनेक प्रकारे राणेंनी ठाकरेंवर आरोप केले आहेत.