लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी झालं. आणि सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होईल. त्यानंतर सर्वांच्या नजरा एक्झिट पोलकडे असणार आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांवर NDA की INDIA आघाडी कोण बाजी मारणार ? कोणाचं सरकार येईल.कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज एक्झिट पोलमधून समोर येत असतो.भाजपने गुजरातमधील सुरतच्या एका जागेवर निकलाआधीच विजय मिळवला आहे..उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत.आता ४ जून रोजी निकाल समोर येतील. त्यापूर्वी १ जून रोजी सायंकाळी विविध एजन्सीज एक्झिट पोल जाहीर करतील. मग त्यांचे हे अंदाज किती अचूक ठरतात? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज बरोबर आणि कोणाचे अंदाज फोल ठरले होते? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
२०१९ ची लोकसभा निवडणूक देखील सात टप्प्यात पार पडली होती.यावेळी जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर काँग्रेसच्या पारड्यात निराशेशिवाय काहीच नव्हते. २०२४ प्रमाणे २०१९ मध्ये विरोधक एकटवलेले नव्हते. त्यांची इंडिया आघाडी नव्हती. युपीए अंतर्गत ते निवडणुकीत उतरले होते. तर अनेक पक्षांनी स्वतंत्र लढाई केली होती.यावेळी दोन एजन्सीचे अंदाज वगळता सर्वांनी भाजप नेतृत्वातील एनडीए ३०० जागांच्यावर जिंकेल असा अंदाज वर्तवला होता. काँग्रेस तर तीन अंकी आकडा गाठू शकणार नसल्याचा अंदाज होता. प्रत्येक एक्झिट पोलमध्ये युपीए १०० जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा अंदाज होता. तर इतर काही संस्थांनी युपीए १२० जागा जिंकण्याचा कल दिला होता. या लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे २०१९ रोजी जाहीर करण्यात आले होते. निवडणुकीच्या निकालावरुन एक्झिट पोलचे अंदाज जवळजवळ खरे ठरले. भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांदा स्वबळावर सत्तेवर आला. भाजपने सर्वाधिक ३०३ जागांवर विजयी पताका फडकवली. तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस केवळ ५२ जागांवर अडकली. तृणमूल काँग्रेस २२, बसपा १०, भाकपा आणि माकपा अनुक्रमे २ आणि ३ तर राष्ट्रवादी काँग्रेस ५ जागांवर विजयी झाली.त्यावेळचा एकूण आकडा बघितला तरएनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३५३ जागा जिंकल्या.यूपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीने ९१ जागा जिंकल्या, तर इतर पक्षांनी ९८ जागा जिंकल्या होत्या.
आता आपण यावेळी कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज बरोबर आणि कोणाचे अंदाज फोल ठरले होते त्यावर एक नजर टाकू.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर देशातील सर्व जागांवरचे एक्झिट पोल दाखवण्यात आले होते.यामध्ये न्यूज 18-इप्सॉसच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३३६ जागा, यूपीएला ८२ तर इतर १२४ जागा जिंकतील असा अंदाज वर्तवला होता.
टाइम्स नाऊ-व्हीएमआरने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३०६ , यूपीएला १३२ आणि इतरांना १०४ जागा दिल्या होत्या.
न्यूज नेशनने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८२ ते २९० जागा दिल्या होत्या. यूपीएकडे ११८ ते १२६ जागा जातील असं म्हटलं जात होतं. त्यांनी इतरांना १३० ते १३८ जागा मिळतील असं सांगितलं होतं.
न्यूज 24-चाणक्य पोलमध्ये एनडीएला ३५० जागा देण्यात आल्या होत्या. तर यूपीएला ९५ आणि इतरांना ९७ जागा दाखवण्यात आल्या होत्या.
न्यूजएक्सने एनडीएला सर्वात कमी २४२ जागा दिल्या होत्या. यूपीएला १६२ तर इतरांना १३६ जागा दाखवल्या होत्या.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्येही एनडीएला ३०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. तर यूपीएला १२० आणि इतरांना १२२ जागा दाखवण्यात आल्या होत्या.
या सर्व एजन्सीजचे अंदाज आपण पाहिले तर यूपीए पैकी त्यांनी एनडीए ला अधिक जागा मिळतील हे सांगितलं होतं. यामध्ये न्यूज 18-इप्सॉस,टाइम्स नाऊ-व्हीएमआर, न्यूज 24-चाणक्य या तीन एजन्सीजचा NDA बाबतचा आकडा ३००+ दिसून आला म्हणजे या तीन एजन्सीजचे अंदाज जवळपास खरे ठरले.तर न्यूज नेशन आणि न्यूजएक्सने NDA बाबतीत वर्तवलेले अंदाज फोल ठरल्याचं दिसून आलं.यूपीए बाबत न्यूज 24-चाणक्यचा आकडा ९५ होता पण मिळाल्या ९१ म्हणजे जवळपास त्यांचा अंदाज बरोबरीच्या तुलनेत होता.पण इतर एजन्सीजचे यूपीए बाबतचे अंदाज मात्र फोल ठरल्याचं दिसून आलं. आता यावेळी १ जूनला वेगवेगळ्या एजन्सीज आप आपला अंदाज मांडतील..भाजपप्रणित NDA आणि काँग्रेस प्रणित INDIA आघाडी कोणाला बहुमत मिळणार, कोण कुठे आघाडीवर राहणार याचे अंदाज हे १ जूनच्या एक्झिट पोल मधून स्पष्ट होतील.त्यानुसार ४ जून रोजी लागणाऱ्या निकालातून २०१९ ला खरे ठरले तसे यावेळचे एक्झिट पोल खरे ठरणार का हे पाहावं लागेल.