पुणे । शहर व जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक ३१ जानेवारी रोजी होणार होती परंतु मतदार यादीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या तसेच मतदार यादीतील काही बोगस नावांवर वकीलवर्गाकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे हि निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता पुढील प्रक्रियेनुसार मतदार यादीवर ८ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.हि निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी जम्बो मंडळ स्थापन केले आहे.