पुणे | आज (२०) दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोसायटीच्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी २ कामगार उतरले असता त्यांचा मृत्यू झाला. त्या कामगारांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाचा शोध “पीएमआरडीए” अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरु आहे.
वाघोली येथील मोझे कॉलेज रस्ता येथे सोलांसिया नावाच्या सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सकाळी ६ वाजता दोन कामगार चेंबर साफ करण्यासाठी उतरले होते. चेंबर साफ करत असतानाच दोन कामगार चेंबरमध्ये पडले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेला सोसायटीचा सुरक्षा रक्षक त्यांना वाचविण्यासाठी गेला, त्यावेळी सुरक्षा रक्षक चेंबर मध्ये पडला, या प्रकाराची माहिती नागरिकांनी “पीएमआरडीए” अग्निशामक दलाला दिली.
त्यानंतर तेथे तत्काळ दाखल झालेल्या जवानांनी चेंबर मधून दोघांचे मृतदेह बाहेर काढले, तर सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मृत्यू पावलेल्या दोन कामगारांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती “पीएमआरडीए” अग्निशामक दलाचे विजय महाजन यांनी दिली.