पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आदिवासी समाज आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले.
19 व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत बिरसा मुंडा हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ते आदिवासी नेते आणि लोकनायक होते. सध्याच्या भारतात रांची आणि सिंध्य भूमीचे आदिवासी बिरसा मुंडा यांचे बिरसा भगवान म्हणून स्मरण केले जाते. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला ब्रिटिशांच्या दडपशाही विरुद्ध उभे करून सन्मान मिळवून दिला.
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आदिवासी समाजाची अनेक मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जयंतीचे निमित्त साधून मुला-मुलींनी आदिवासी नृत्य प्रकार देखील सादर केले. यावेळी कलाशिक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थिनींनी बिरसा मुंडा यांचे सुरेख चित्र रेखाटले.
या समारंभात अनेक आदिवासी समाजातील मुलांनी सुंदर हस्ताक्षर काढून बक्षीसे जिंकली. या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, हिंदी विभाग प्रमुख पांडुरंग जगताप आणि विकास तिरखुंडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट नील दोंदे या विद्यार्थ्याने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोमनाथ अवचर यांनी केले.