फुलगाव | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये बालदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तसेच शाळेच्या सर्व मुलांची सहल मोराचे चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी गेली. या सहलीचा विद्यार्थ्यांनी विशेष आनंद लुटला.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. हा दिवस सैनिकी शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नको अभ्यास, नको नियम, नको वही आणि पेन…नाचू, गाऊ, फिरू आणि मज्जा करू खूप, अशा पद्धतीने मुलांच्या आवडीच्या आनंददायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या सहलीचा अनुभव घेतला.
याप्रमाणेच शाळेतील सर्व मुले मोराचे चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी संपूर्ण दिवस आनंद लुटण्यासाठी नेले होते. दिवसभरामध्ये स्विमिंग टॅंक, स्काय सायकलिंग, मॅजिक शो, बैलगाडी सफर, जंगल सफर अशा विविध प्रकारांचा मुलांनी आनंद लुटला.
या बालदिनानिमित्त सहलीचे संयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी केले होते. या सहलीसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्रीडाशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.